Posts

#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

टीम ऑरिझोन

Image
  आयुष्याच्या वाटेवर अनेक पायऱ्या येतात वेळोवेळी            त्या पायऱ्यांवर पाय ठेवून मिळवू यश पदोपदी..... अशीच एक महत्वाची पायरी म्हणिजे नोकरी. आताच्या जगात बऱ्यापैकी सगळेच नोकरी करतात. कोणी आवड म्हणून, कोणी परिस्थिती ची जाणीव म्हणून.         माझी ही पहिली नोकरी असल्यामुळे उत्साह खूप होता. नवीन काही तरी शिकू, आपण पण ऑफिस मध्ये जाऊन काम करू याचा आंनद होता. कधी काळी लहानपणी अभ्यास नको असलेले आपण नोकरी करायची इच्छा व्यक्त करायचो आणि आता तेच सत्यात उतरताना दिसत होते. सुरवातीला एक महिना काम घरून च करायचं होतं नंतर मात्र ऑफिस मधून काम करायचं होतं. आता कुठे घरून काम करायचं वेळापत्रक जुळत आल होत आता परत त्यात बदल करावा लागणार होणार होता. अर्थातच त्या नवीन वेळापत्रकाशी जुळवून घ्यायला वेळ सुद्धा लागणार होता.         पण ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्या साठीच होतं. ऑफिस मधून काम चालू झाल्यापासून सगळ्यांना भेटता आलं त्या सगळ्यांशी जवळीक वाढत गेली. मला प्रशिक्षण देणारे अक्षय सर मला आधी थोडे रागीट आणि उद्धट वाटायचे पण जेव्हा त्यांना समोरून बघितल तेव्हा समजल की ते उद्धट नव्हते. ते स्वभावाने खूप चांग

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

      पावसाळ्याची चाहूल लागताच मन कस सैरावैरा धाऊ लागतं. तो मातीचा दरवळणारा सुगंध, थंडगार वाहणारा वारा कसा हवाहवासा वाटतो आणि अशा या मनमोहक वातावरणात मनसोक्त फिरण्याची गम्मतच काही न्यारी असते म्हणून च नवीन नवीन ठिकाणी जाण्याचे विचार मनात भिरभिरत असतात. तसाच काहीसा विचार आमच्या ही मनात आला आणि शेवटी आम्ही त्या विचारावर अंमलबजावणी करायचं ठरवलं. आता सगळ्यात मोठा आणि नेहमीच ठरलेला प्रश्न आमच्या समोर होता. जायचं कुठे??         कोणत्या तरी अगदी महत्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्यासारखी जणू आमची बैठक च बसली होती. काय तर मग सगळ्यांच्या सहमतीने आमचं एक ठिकाण ठरलं. पण सगळं ठरून झाल्यावर ती योजना रद्द होणार नाही असं होणं तर शक्यच नाही. तसंच काहीसं आमच्या सोबत पण झालं सगळं ठरल्यावर मात्र आमची ती योजना पार पडली नाही. सगळे अगदी निराश होऊन बसले होते. काही तरी छोटासा मुद्दा आडवा यावा आणि त्या बघितलेल्या स्वप्नांचा चुरा व्हावा अस झालं होतं ते. पण बाहेर फिरण्याची आमची सगळ्यांचीच अगदी तीव्र इच्छा असल्यामुळे काहीही करून आम्ही ती योजना सफल करायचं ठरवून ठेवलं होतं. काय तर मग आधीच सगळ्या गोष्टी ठरवून ठेवल्

निरोप

        तुम्हाला सगळ्यांनाच जरा नवलच वाटलं असेल. अजून कशाला काही सुरवात नाही आणि पहिलाच शब्द निरोप!!         अर्थातच निरोप घ्यायचा म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात हेच येत की आपण आता कधी भेटणार नाही एकमेकांपासून दूर होऊ. पण आपल्याला जे निरोप देणार असतात त्यांचा हेतू आपल्याला दुखवायचा नसतो तर ते त्या निरोपाचा माध्यमातून आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात हे आपण विसरून च जातो.        आपल्या सगळ्यांनाच आपली १० वी झाली की शाळेकडून निरोप मिळतो, थोडक्यात sandoff. १२ वी झाल्यावर कॉलेज मधून ही मिळतो. पण आज पर्यंत कधी हॉस्टेल मधून पण sandoff होतो हे माहीत नव्हतं. आणि आज तोच दिवस उजाडला. आमचा त्या हॉस्टेल मधला शेवटचा दिवस. खर तर हॉस्टेल मधून आपण निघतोय म्हणून सगळ्यांनाच आनंद होतो. इथून पुढे ते कडक नियम पाळावे लागणार नसतात. आपल्याला आपलं आयुष्य हवं तसं जगण्याची मुभा मिळणार असते. पण आमचं मात्र तस नव्हतं. ते आमचं हॉस्टेल कमी आणि दुसरं घर जास्त होत जिथे आमचे आई बाबा नसून काका काकू होते. हे काका काकू म्हणजे सगळ्यांच्या शब्दातले रेक्टर च पण आम्ही त्यांना काका क

वातावरणातील फेरबदल....

Image
नमस्कार मित्रमंडळींनो...               दररोजच्या या धावपळीच्या दूनियेमधून सगळ्यांनाच थोडसं relaxation हवं असतं.मग ते कोणीही असो शाळेत, कॉलेज मध्ये शिकणारे मुल किंवा नोकरी करणारी मोठी माणसं.कॉलेज च्या मुलांसाठी असते ती म्हणजे सहल. सहली चा विषय निघाला की सगळ्यांना एका वेगळ्या प्रकारची उत्सुकता लागलेली असते.मस्त खायचं प्यायचा ,मज्जा करायची,इकडे तिकडे फुलपाखरां सारखं बागडायच,खेळ खेळायचे आणि अजुन काय काय. मुलांच्या मनात किती प्रश्न येतात.कुठे जायचं,कधी जायचं,किती दिवस जायचं,कुठे कुठे फिरायच,काय न्यायचं ? बापरे.. आमचे तर कसे एकदम मज्जेचे दिवस आल्यासारखं वाटत होतं .आधी सहल नंतर स्नेह संमेलन हे सगळं मागोमाग असल्याने आमच्या कॉलेज मध्ये पालकांची सभा भरवण्यात आली होती.सभेचा विषय तर आम्हाला माहितच होता.पण सहल कुठे जाणार,कधी जाणार हे माहीत नव्हतं.पालकांची सभा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आमची सहल ७ दिवसांसाठी बँगलोर ला जाणार आहे.             खरं तर ते ऐकून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.पण जस एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसे माझ्या मनात विचार येत होते.एक बाजू म्हणायच

अनोळखी पर्वातील पहिलं पाऊल...

Image
जून महिना जसा जसा जवळ येतो तस तस मुलांची उत्सुकता वाढत जाते. शाळेतून कॉलेज मध्ये जाणार याचा खूप आनंद झालेला असतो.नवीन कॉलेज,नवीन वर्ग,नवीन शिक्षक,नवीन मित्र मैत्रिणी सगळा काही नवीन असतं.त्यामुळे थोडी भीती ही असतेच मनामध्ये.१० वी पर्यंत चे सगळे शिक्षक कसे आपल्या ओळखीचे होते.त्यांची शिकवण्याची पद्धत आपल्याला अवगत होती.आपण त्यांच्यामध्ये त्या १० वर्षात अगदी रुळून गेलो होतो.मग अचानक या नवीन कॉलेज मध्ये यायचं तर भीती ही वाटणारच ना?कारण तिथुन आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते.            कॉलेज म्हटलं की सगळ्या मुलांच्या मनात एकच असत.खूप मज्जा करायची, लेक्चर चुकवून कुठे तरी बाहेर जायचं , कॉलेजच्या मैदानात मनसोक्त खेळायच. तिथले शिक्षक जास्त ओरडत नाहीत .शाळेत जस इथेच बसून अभ्यास कर म्हणतात तस करत नाही. विद्यार्थ्यांना ओरडत नाही असा समज हा सगळ्या मुलांचा होतो.पण आमचं ज्ञानदीप कॉलेज मात्र अगदी शाळेसारख होत. जसं शाळेत आपल्याला  गणवेश  असायचा तसा या कॉलेज ला सुद्धा गणवेश होता.आणि खर सांगायचं झालं तर कॉलेज का सुद्धा गणवेश आहे हे ऐकूनच मला खूप आनंद झाला होता.खरंच ना नाहीतर आम्हा मुलींचा अर्धा जास्त

मैत्रीच्या वाटेवर....

Image
मैत्रीच्या वाटेवर ....                                       लहापणापासून मित्रांसोबत केलेला आयुष्याचा प्रवास हा किती सुरेख असतो ना? ना आपल्याला कोणी काही बोलतील याची चिंता आणि कोणी आपल्याशी कसं वागेल याची काळजी...खरंच किती सुंदर आणि सुरेख असता ते बालपण.. सगळ्यांचेच कोणी ना कोणी असे मित्र असतात की त्याची जागा कधी कोणालाच देता येत नाही.आणि ती मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात.                                         ओळख नसतानाही उगाच कागदाचे छोटे छोटे गोळे मारून फेकायचे , वेण्या ओढायच्या असे चित्र विचित्र प्रकार हे मित्र च करत असतात. आपल्या फ्रेंड्स मध्ये एक वेगळेच नात तयार होतं.आपले मित्र हे आपल्या सुखं दुःखात सहभागी होणारे असतात.त्यांच्या मध्ये कुठलाही स्वार्थी पणा नसतो.एक मेकांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून, अगदी चेहरे बघून सुद्धा हे लगेच ओळखतात की आपल कुठे काही बिनसलं आहे का ? आपण आनंदी आहोत का ? कुठली गोष्ट आपल्याला सतावतेय का? असे हे मित्र आयुष्यभर सोबत असले तर जग्याची मज्जा काही वेगळीच असते...   पण हे जे आयुष्य आहे ना ते आपल्याला वाटत तितका सोप्पा नसतं. आयुष्याच्या या खडतर व