#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

निरोप

 

      तुम्हाला सगळ्यांनाच जरा नवलच वाटलं असेल. अजून कशाला काही सुरवात नाही आणि पहिलाच शब्द निरोप!! 

       अर्थातच निरोप घ्यायचा म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात हेच येत की आपण आता कधी भेटणार नाही एकमेकांपासून दूर होऊ. पण आपल्याला जे निरोप देणार असतात त्यांचा हेतू आपल्याला दुखवायचा नसतो तर ते त्या निरोपाचा माध्यमातून आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात हे आपण विसरून च जातो.

       आपल्या सगळ्यांनाच आपली १० वी झाली की शाळेकडून निरोप मिळतो, थोडक्यात sandoff. १२ वी झाल्यावर कॉलेज मधून ही मिळतो. पण आज पर्यंत कधी हॉस्टेल मधून पण sandoff होतो हे माहीत नव्हतं. आणि आज तोच दिवस उजाडला. आमचा त्या हॉस्टेल मधला शेवटचा दिवस. खर तर हॉस्टेल मधून आपण निघतोय म्हणून सगळ्यांनाच आनंद होतो. इथून पुढे ते कडक नियम पाळावे लागणार नसतात. आपल्याला आपलं आयुष्य हवं तसं जगण्याची मुभा मिळणार असते. पण आमचं मात्र तस नव्हतं. ते आमचं हॉस्टेल कमी आणि दुसरं घर जास्त होत जिथे आमचे आई बाबा नसून काका काकू होते. हे काका काकू म्हणजे सगळ्यांच्या शब्दातले रेक्टर च पण आम्ही त्यांना काका काकू म्हणायचो.

       तुम्हाला आता प्रश्न तर पडलाच असेल. की एखादी व्यक्ती हॉस्टेल ला घर कस म्हणू शकते. हॉस्टेल ला तर सगळेच राहतात, मज्जा पण सगळेच करतात पण त्याला आपल्या घराची जागा सहजा सहजी कोणी देतं नाही. आम्ही दिली त्याला कारणीभूत तिथलं वातावरण. जिथे आम्ही कुठलीही भीती न बाळगता सहज बागडत  होतो, अख्या घरात लपाछपी खेळत होतो,थोडंस कुठे लागलं की पूर्ण हॉस्टेल डोक्यावर घेत होतो, रोज संध्याकाळी फिरायला जात होतो, कधी घरात बसून बसून बोर झालो तर काका काकूंसोबत सिनेमा बघायला जायचो, त्यांच्या मित्र मैत्रिणीसोबत फिरायला जायचो, कधी कधी तर काका काकूंच्या मित्राच्या रिसॉर्ट वर जायचो, इतकच काय तर जस आपण घरी छोट्या मोठ्या कुरबुरी करायचो तशाच इथेही करायचो. एवढा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी ज्या ठिकाणी आपल्याला मिळतेय त्याला हॉस्टेल म्हणणं जरा चुकीचंच आहे नाही का? आणि आता तर याच वातावरणातून बाहेर पडायच होत म्हणजे अर्थातच तिथून जाणार याचा आनंद नक्कीच झाला नव्हता.

       सगळ्या मुलींनी आमच्या sandoff ची खूप छान तयारी केली होती. २ वर्ष वाणिज्य शाखेत शिकत होतो म्हणून मग त्याच काही अंदाजमध्ये निरोप समारंभ करायचं त्यांनी ठरवलं होतं. आणि त्यांच्या त्या कल्पना ऐकूनच आम्ही अवाक झालो होतो. आता निरोप समारंभ आहे म्हटल्यावर काहीतरी आपल्या बद्द्ल छान काही बोलतील अस वाटलं होतं. पण इथे तर बापरे!! त्यांनी चक्क आमच्यावर खटला भरवण्याचा ठरवलं होतं.एका बाजूला १२ वी च्या मुली आणि एका बाजूला ११ वी च्या मुली आणि आमच्यावर भरवले गेलेले खटले बरोबर आहेत की नाही आणि आम्हाला त्यावर शिक्षा काय करायची याचा निकाल लावायला एका बाजुला आमचे  काका काकू  जणू न्यायाधीश म्हणून च बसले होते.

       एक आगळा वेगळा खटला आमच्यातल्याच एक मुलीवर भरवला होता. ती मुलगी सारखी पडायची तर तीच्या त्या पडण्यामुळे हॉस्टेल ची इमारत कमकुवत झाली आहे आणि ती कधी ही कोलमडून पडू शकते असा खटला तिच्यावर भरवला होता. आज त्याची शिक्षा म्हणून तिला पूर्ण एक दिवस तू पडणार नाही याची दक्षता घेऊन चालायला सांगितलं. 

       तसाच एक खटला माझ्यावर ही भरवण्यात आला जस मी आधीच सांगितलं होतं की मी खुप हळवी होती इतकी की अगदी सहजतेने रडायची. माझ्या या स्वभावामुळे माझ्यावर कधी कोणी खटला भरवू शकतो ही कल्पनाच मला करवत नव्हती. पण माझ्यावर माझ्या याच स्वभावामुळे खटला भरवण्यात आला काय तर म्हणे जेव्हापासून हिने पिरलोटे गावातून खेड शहरामध्ये मध्ये स्थलांतर केलय तेव्हा पासून पिरलोटे गावात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तर खेड शहराला २ वेळा पूरपरिस्थिती चा सामना करावा लागला. असा सुद्धा खटला एखाद्यावर भरू शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. पण असा चित्र विचित्र खटला आपल्यावर भरवण्यात आला याच सुद्धा हसू येत होतं. अप्रूप वाटत होतं आणि त्यावर मला कोणीही कितीही वाईट किंवा चांगलं म्हणाल तरी पुढचे ५ मिनिट मी कोणालाच काहीच प्रतिसाद देणार नाही आणि रडणार चिडणार तर अजिबात नाही अशी शिक्षा सुनावण्यात आली होती.

       खरच यांच्या या एका वेगळ्या कल्पनेमुळे आमचा निरोप समारंभ मात्र खूप अविस्मरणीय ठरला. जिथे आम्ही एकमेकांना सोडून जाऊ या विचाराने भांबावून गेलो होतो भावुक झालो होतो आता त्याच निरोप समारंभात आम्ही हसत खेळत होतो. आणि त्यांच्या त्याच एका कल्पनेमुळे  आमच्या पुढच्या वाटचाली साठी  आमच्यावर नकळतपणे सकारत्मक शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. जिथे आतापर्यंत इतक प्रेम , जिव्हाळा मिळाला आता तिथून निघताना मनात साठवलेल्या खूप गोड आशा आठवणी राहिल्या होत्या. तिथून जायच दुःख होतच पण परत आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी सांगायला वेळ काढून आम्ही पुन्हा तिथे  येणार होतो याचा आनंद होता आणि तीच खूप मोठी उमेद होती.

       खर तर आम्ही त्या हॉस्टेल मधून निघून आमच्या घरीच जाणार होतो जिथे जायची आपण खूप आतुरतेने  वाट बघत असतो पण आमचं मन मात्र आम्ही पहिल्यांदा घर सोडून खूप लांब जाण्याची भावना व्यक्त करत होतं.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन