#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

      पावसाळ्याची चाहूल लागताच मन कस सैरावैरा धाऊ लागतं. तो मातीचा दरवळणारा सुगंध, थंडगार वाहणारा वारा कसा हवाहवासा वाटतो आणि अशा या मनमोहक वातावरणात मनसोक्त फिरण्याची गम्मतच काही न्यारी असते म्हणून च नवीन नवीन ठिकाणी जाण्याचे विचार मनात भिरभिरत असतात. तसाच काहीसा विचार आमच्या ही मनात आला आणि शेवटी आम्ही त्या विचारावर अंमलबजावणी करायचं ठरवलं. आता सगळ्यात मोठा आणि नेहमीच ठरलेला प्रश्न आमच्या समोर होता. जायचं कुठे??

        कोणत्या तरी अगदी महत्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्यासारखी जणू आमची बैठक च बसली होती. काय तर मग सगळ्यांच्या सहमतीने आमचं एक ठिकाण ठरलं. पण सगळं ठरून झाल्यावर ती योजना रद्द होणार नाही असं होणं तर शक्यच नाही. तसंच काहीसं आमच्या सोबत पण झालं सगळं ठरल्यावर मात्र आमची ती योजना पार पडली नाही. सगळे अगदी निराश होऊन बसले होते. काही तरी छोटासा मुद्दा आडवा यावा आणि त्या बघितलेल्या स्वप्नांचा चुरा व्हावा अस झालं होतं ते. पण बाहेर फिरण्याची आमची सगळ्यांचीच अगदी तीव्र इच्छा असल्यामुळे काहीही करून आम्ही ती योजना सफल करायचं ठरवून ठेवलं होतं. काय तर मग आधीच सगळ्या गोष्टी ठरवून ठेवल्या मुले आणि आम्ही फक्त योग्य वेळेच्या शोधात होतो, जेव्हा कोणाचं काही काम आडव येणार नाही आणि आमचे सगळ्यांचे ते आठवड्याचे शेवटचे दोन दिवस हसत खेळत मज्जा करत जातील.

        शेवटी तो दिवस उजाडलाच आम्ही सगळे आमच्या प्रवासाला लागलो. आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं होतं कुठे जायचे त्यामुळे आमचा उत्साह जणू गगनाला भिडला होता. हसत खेळत हळू हळू आमचा प्रवास चालू होता. आम्ही आमची दुचाकी घेऊन जात असल्यामुळे ती चालवून चालवून आम्ही पूर्ण थकून गेलो होतो. शेवटी आम्ही ठरलेल्या गंतव्यास्थानावर पोहोचलो.आणि ते म्हणजे पवना लेक. सुंदर असा मन मोहून टाकणारा तो आजू बाजूचा परिसर आणि त्या वाहत्या पाण्याचा प्रवाह त्याच्या सोबत आमचा सगळा थकवा हळू हळू घेऊन जात होता. तिथल्या त्या वातावरणात आमचा वेळ मात्र त्या पाण्याच्या प्रवाहासारखा संथ गतीने जात होता. आणि आम्हाला सुदधा तेच हवं होतं. त्या थोड्याश्या फावल्या वेळात आम्ही खूप फोटो काढले, खूप डान्स केला अर्थातच सगळ्या गोष्टींचा पुरेपूर आनंद घेतला. आमची ती अशी पहिली रात्र होती जेव्हा आम्ही सगळ्या मैत्रिणी रात्रभर बाहेर होतो. त्यात  एवढी धमाल मस्ती करता करता आमचा थकलेला छोटासा जीव आता विश्रांती च्या शोधात होता. आम्हाला मस्त तंबू दिले होते. तिथेच विश्रांती घ्यावं अस वाटत होतं पण काहीतरी वेगळं करायचं म्हणून जस एकाद्या सिनेमा मध्ये दाखवतात तस आम्ही आकाशातल्या चांदण्या बघत पडलो होतो. त्या लुकलुकणाऱ्या चांदण्या बघत बघत आमच्या खूप गप्पा रंगल्या होत्या. त्या चांदण्याचा तो प्रकाश, सुटलेला वारा आणि पावसाची ती बारीक सर ती रात्र संपू च नये असं सांगत होती. आम्ही तर ठरवूनच ठेवल जात की रात्रभर कोणी झोपणार नाही पण त्या गार वाऱ्याच्या हळुवार स्पर्शामुळे आम्हाला झोप येत होती जणू काही तो त्याच्या त्या हळुवार स्पर्शाने आम्हाला थोपटून झोपवत होता.

        रोज सकाळी लवकर उठायची किरकिर करण्याऱ्या आम्ही सगळ्याच त्या दिवशी लवकर उठलो. सकाळी सकाळी त्या पाण्यामध्ये जाऊन उभे राहिलो त्यानंतर जी भावना मनात उफाळून आली त्याने मात्र अंगावर शहारे आणले. नाश्ता वगैरे करून मस्त बोटिंग करायला गेलो. तिथून निघावस तर कोणालाच वाटत नव्हत. पण वेळेची मर्यादा ओलांडून चालणार नव्हतं. आम्ही आवरत घेतल आणि निघायची तयारी केली. पण आपण एक ठिकाणी गेलो आणि सरळ परत आलो अस तर कधीच होत नाही. आमची एक दुचाकी पंचर झाली होती तर दुसरी सुरूच होत नव्हती. आता मात्र आमची पंचाईत झाली होती. शेवटी मेकॅनिक बोलवून पंचर काढून घेतलं पण दुसरी गाडी मात्र अजून चालू होत नव्हती. शेवटी त्या मेकॅनिकने आमची गाडी त्याच्या गाडीला बांधली आणि आता ते गॅरेज वर घेऊन जात होते. त्यांच्याकडे बुलेट होती पण त्यांची उंची कमी होती त्यामुळे त्यांना त्यांचीच गाडी पेलवत नव्हती. अंगापेक्षा भोंगा मोठा तस त्यांचं झालं होतं आणि त्यात ते आमची पण गाडी घेऊन जात होते. आम्हाला भीती वाटत होती की ते आमच्या गाडीवर बसलेल्या माझ्याच मैत्रिणीला म्हणजेच शुभांगी ला पाडणार तर नाहीं ना? चढावावर तर त्यांना ती गाडी पुढे घेऊन जाण शक्यच होत नव्हत. म्हणून मागून मी ती गाडी ढकलत चालली होती. शेवटी आम्ही गॅरेज वर पोचलो. आमची गाडी सुरू झाली आणि मग परत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आम्ही येता येता अगदी उत्कंठा वाढवणारी काही तरी कृती करून आलो अस जाणवत होतं. खरं तर आम्ही बाहेर गेलो होतो हे बऱ्याच जणांना माहीत होतं पण आमच्या सोबतचे झालेले किस्से आणि आम्ही केलेल उत्कंठा वाढवणार काम मात्र कोणालाच माहीत नव्हतं.



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

टीम ऑरिझोन