#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

अनोळखी पर्वातील पहिलं पाऊल...



जून महिना जसा जसा जवळ येतो तस तस मुलांची उत्सुकता वाढत जाते. शाळेतून कॉलेज मध्ये जाणार याचा खूप आनंद झालेला असतो.नवीन कॉलेज,नवीन वर्ग,नवीन शिक्षक,नवीन मित्र मैत्रिणी सगळा काही नवीन असतं.त्यामुळे थोडी भीती ही असतेच मनामध्ये.१० वी पर्यंत चे सगळे शिक्षक कसे आपल्या ओळखीचे होते.त्यांची शिकवण्याची पद्धत आपल्याला अवगत होती.आपण त्यांच्यामध्ये त्या १० वर्षात अगदी रुळून गेलो होतो.मग अचानक या नवीन कॉलेज मध्ये यायचं तर भीती ही वाटणारच ना?कारण तिथुन आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते.
           कॉलेज म्हटलं की सगळ्या मुलांच्या मनात एकच असत.खूप मज्जा करायची, लेक्चर चुकवून कुठे तरी बाहेर जायचं , कॉलेजच्या मैदानात मनसोक्त खेळायच. तिथले शिक्षक जास्त ओरडत नाहीत .शाळेत जस इथेच बसून अभ्यास कर म्हणतात तस करत नाही. विद्यार्थ्यांना ओरडत नाही असा समज हा सगळ्या मुलांचा होतो.पण आमचं ज्ञानदीप कॉलेज मात्र अगदी शाळेसारख होत. जसं शाळेत आपल्याला  गणवेश  असायचा तसा या कॉलेज ला सुद्धा गणवेश होता.आणि खर सांगायचं झालं तर कॉलेज का सुद्धा गणवेश आहे हे ऐकूनच मला खूप आनंद झाला होता.खरंच ना नाहीतर आम्हा मुलींचा अर्धा जास्त वेळ तर उद्या कुठला ड्रेस घालायचा याचा विचार करण्यातच निघून गेला असता.
          सगळं अगदी मनासारखं कॉलेज मला मिळालं होतं मस्त आजूबाजूला हिरवळ होती.मोठं मैदान होतं.मोठे मोठे वर्ग होते.फक्त शिक्षकांची ओळख व्हायची बाकी होती.नवीन मित्र मैत्रिणी कसे मिळणार? आपल्या शेजारी आपल्या बाकावर कोण बसणार हा प्रश्न तर हॉस्टेल मुळे जणू काही आम्ही विसरून च गेलो होतो.कॉलेजच्या पहिल्या दिवशी आम्ही बरोबर ९ वाजता वर्गात गेलो. सहजासहजी कुठल्या कॉलेज मध्ये प्रार्थना होते अस वाटत तर नाही पण आमच्या त्या ज्ञानदीप कॉलेज मध्ये मात्र रोज प्रार्थना व्हायची.
कॉलेज चा पहिला दिवस असुदे किंवा शाळेचा,पहिल्या दिवशी ठरल्याप्रमाणे एकमेकांची ओळख करून दिली जायची .मुलांची आणि शिक्षकांची...पहिल्या तासाला आमचे class teacher वर्गात आले.आधी त्यांनी त्यांची ओळख करून दिली आम्हाला.आणि नंतर त्यांनी आमची ओळख करवून घेतली.ते आमचे class teacher या नात्याने त्यांनी आम्हाला सगळ्यात आधी कॉलेज चे काही नियम सांगितले.१० वी नंतर ११ वी शिकायची म्हणून त्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला होता. ते कॉलेज सर्वांसाठीच नवीन असल्याने आम्हाला सगळ्यात आधी कॉलेच चे नियम सांगण्यात आले.कॉलेज मध्ये मोबाईल आणायचा नाही,कॉलेजच्या अगदी पहिल्या तासापासून ते शेवटच्या तासापर्यंत सगळे लेक्चर attend करायचे.प्रत्येक शिक्षकांची ओळख करून देण्याची पद्धत वेगळी होती.काही शिक्षक खूप साध्या पद्धतीने ओळख करून देत होते.पण त्या पहिल्या दिवशी मात्र आम्हाला खूप मज्जा आली.
            सगळे शिक्षक हे स्वभावाने थोडे कडकच होते.जस आपला सगळ्याच कॉलेज बद्दल च मत असतं तस ते कॉलेज अजिबात नव्हतं ते त्या कॉलेगच्या नियमंवरून अगदी सहजतेने कळून येत.तिथल्या शिक्षकांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे.जरी त्या कॉलेज मध्ये विज्ञान आणि वाणिज्य अशा दोन वेगवगळया शाखा जरी असल्या तरी त्या दोन्ही शाखांमध्ये शिकवणारे शिक्षक मात्र सगळ्यांशी बोलून चालून राहणारे होते.सगळ्या विद्यार्थ्यांची सारखी काळजी घेणारे होते. खरंच असे शिक्षक मिळायला सुद्धा भाग्य च लागतं म्हणायचं .आता क्या कॉलेज मध्ये शिक्षक आहेत पण ते फक्त ज्ञान देण्यापुरते च आहेत.पण या कॉलेज चे शिक्षक जस ज्ञान देणारे होते तसेच ते विद्यार्थ्यांची काळजी करणारी होते,त्यांना शिस्त लावणारे होते.ओळख करून देताना काही शिक्षकांनी खूप वेगळी अशी त्यांची ओळख करून दिली.जसे आमचे वर्ग शिक्षक त्यांनी त्यांची ओळख करून देताना माझ नाव A A A आहे अस सांगितल .आधी तर काही कळलं नाही आम्हाला नंतर त्यांनी पूर्ण नाव सांगितलं अतुल अभिमान आगलावे.
            तसेच विज्ञान शाखेच्या सरांनी वर्गात आल्या आल्या फळ्यावर  I am M         A          D अस लिहिलं.आता अस लिहिलं म्हणजे कोणाला काय कळणार ना? सुरुवातीला हसायाला आला.नंतर मात्र त्या सरांनी रिकाम्या जागा भरतो तस बाकीचे अक्षर भरले.तेव्हा कुठे आम्हाला कळलं की सरांच नाव Makarand Arvind Dabke अस आहे.खरंच किती वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांची ओळख करून दिली.
           सगळेच सर हे चांगले मार्गदर्शन करणारे होते. कोणाचं काही चुकलं तर समजावून सांगणारे होते. जे मुल आपला घर सोडून हॉस्टेल का राहतात त्यांची रोज चौकशी करणारे होते. शिस्तबद्ध होते आणि विनोद करणारे पण होते.जस ते त्यांनी दिलेला अभ्यास जर चांगला रीतीने केल्या तर कौतुक करायचे तसाच आमचं काही चुकलं तर ओरडायचे सुद्धा.त्याच उदाहरण द्यायचं झालं तर आमचे घुंबरे सर च बघा ना जर काही चुकलं प्रोजेक्ट करताना किंवा अभ्यास करताना तर लगेच बोलतात काय हे तुम्ही कशा चुका करताय तुमचं ना पोस्टर च लावायला हवा तिनबत्ती नाक्यावर. तिनबत्ती नाका म्हणजे आमच्या खेड च्या बस स्टँड जवळ असलेला चौक. आता अस बोलला म्हणजे साहजिक आहे एखाद्याला राग येणं.पण आमची गोष्ट काही न्यारीच होती.सरांच्या त्या बोलण्यात सुद्धा एक प्रकारचा प्रेम आणि जिव्हाळा लपलेला असायचा त्यामुळेच त्यांच्या त्या उद्गारावर आम्ही लगेच हसायचो.खरंच किती त्या सुंदर आठवणी आहेत. ज्या खूप अविस्मरणीय आहेत.जितक्या वेळा त्या आठवाव्या तितक्याच त्या ताज्या होत जातात. प्रकर्षाने जाणवतात.अस वाटायला लागतं की ते आयुष्य तर आपण आताच तर जगलोय......आणि असाच काहीसं अजुन पुढे जगायचंय.....


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन