#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

टीम ऑरिझोन

 




आयुष्याच्या वाटेवर अनेक पायऱ्या येतात वेळोवेळी

           त्या पायऱ्यांवर पाय ठेवून मिळवू यश पदोपदी.....


अशीच एक महत्वाची पायरी म्हणिजे नोकरी. आताच्या जगात बऱ्यापैकी सगळेच नोकरी करतात. कोणी आवड म्हणून, कोणी परिस्थिती ची जाणीव म्हणून.

        माझी ही पहिली नोकरी असल्यामुळे उत्साह खूप होता. नवीन काही तरी शिकू, आपण पण ऑफिस मध्ये जाऊन काम करू याचा आंनद होता. कधी काळी लहानपणी अभ्यास नको असलेले आपण नोकरी करायची इच्छा व्यक्त करायचो आणि आता तेच सत्यात उतरताना दिसत होते. सुरवातीला एक महिना काम घरून च करायचं होतं नंतर मात्र ऑफिस मधून काम करायचं होतं. आता कुठे घरून काम करायचं वेळापत्रक जुळत आल होत आता परत त्यात बदल करावा लागणार होणार होता. अर्थातच त्या नवीन वेळापत्रकाशी जुळवून घ्यायला वेळ सुद्धा लागणार होता.

        पण ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्या साठीच होतं. ऑफिस मधून काम चालू झाल्यापासून सगळ्यांना भेटता आलं त्या सगळ्यांशी जवळीक वाढत गेली. मला प्रशिक्षण देणारे अक्षय सर मला आधी थोडे रागीट आणि उद्धट वाटायचे पण जेव्हा त्यांना समोरून बघितल तेव्हा समजल की ते उद्धट नव्हते. ते स्वभावाने खूप चांगले होते. कायम मदतीचा हात पुढे करणारे, चुकलं तर प्रेमाने समजावून सांगणारे होते. जणू ते आमचे खूप छान मित्रा बनून गेले होते, कधीही गरज पडली तर आमच्या मागे उभे असायचे, सल्ले द्यायला तत्पर असायचे. सचिन चा स्वभाव पण छान होता. ते समजून पण घ्यायचे आणि शांतपणे ऐकून पण घ्यायचे. आतापर्यंत आपण काही तरी बोललो आणि त्यांचा पारा चढला अस कधी झालच नाही. ते मनमिळावू होते.

      डायना च्या मनात काही नसायचं पण तिला मराठी भाषा येत नसल्याने ती बोलायची त्याचा काही वेगळाच अर्थ निघायचा. अनवर जी आमच्या सगळ्या टीम मध्ये मोठे होते त्यामुळे आपल्या सोबत कोणी तरी मोठं आहे याची खात्री होती. अनुप ची तर गोष्ट च निराळी होती. भाव व्यक्त करण्यात आणि सगळ्यांना हसवण्यात माहीर ते होते. बाकीचे पण छान होते फैझल, संदीप, सिद्धार्थ, कौस्तुभ हे घरून च काम करत असल्यामुळे त्यांच्याशी फार कमी बोलणं होत होतं.                    मला खूप चांगलं आठवतय शुभांगी आणि माझ्या मध्ये बोलायची सुरवातच ताई या शब्दावरून झाली. त्यावेळी ते माझं तिच्याशी झालेलं पहिलं बोलणं होतं मी तिला ओळखत ही नव्हते पण माझंच काही काम होतं म्हणून मग मी बोलायला गेले. आम्ही बोलत तर कॉल वरच होतो पण तरीही मला प्रश्न पडला होता की मी तिला काय म्हणून हाक मारू म्हणून मग ताई च हाक मारली. तेव्हा तो माझ्याकडून दोन अक्षरी सहज बोलला गेलेला शब्द होता पण आता मात्र त्याची मर्यादा ओलांडली गेली होती. खरोखरच आमच्यात मैत्रीचं आणि बहिणीचं नात नव्याने खुलून आल होतं. अनोळखी असणाऱ्या आमच्या दोघींमध्ये खूप छान मैत्री झाली होती. खूप खोलवर ती कुठे तरी रुतून बसली होती. बॉंडिंग एवढी छान होती की सगळ्यांना ती माझी बहिण वाटत होती. कधीही गरज पडली तर तिचीच आठवण येत होती. 

       हे सगळं आता लिहायच्या मागे सुद्धा एक कारण होतं ते म्हणजे आमची प्रोसेस जात होती. हे समजल्यावर आम्हाला सगळ्यांचा धक्का बसला होता. आमची एवढी चांगली प्रोसेस जातेय म्हटल्यावर वाईट तर वाटत होतं पण त्यापेक्षा ही वाईट म्हणजे आम्ही सगळे आता खूप कमी दिवस सोबत राहणार होतो. एकमेकांची आता इतकी सवय होऊन बसली होती की त्यांच्याशिवाय कस राहायचं या विचाराने सगळे अवाक झालो होतो. जितक शक्य होईल तेवढा वेळ आम्ही सोबत घालवला. परत कधी सोबत काम करायची ,राहायची संधी मिळेल ते आम्हाला ठाऊक नव्हतं. आणि त्यामुळेच जिवाच्या आकांताने ही सगळी तळमळ चालू होती. I don't care, I don't care करता करता Esrayelu सर म्हणजे आमचे टीम लीड कधी आमची काळजी करायला लागले तेच कळाल नाही. आमच्या प्रोसेस मध्ये अजून पण खूप जण होते पण मी जेव्हा आले तेव्हा ते कोणीच नव्हते त्यामुळे मी त्यांच्याशी अजिबात अवगत नव्हते. पण आमच्याच टीम मधल्या काही सहकाऱ्यांकडून त्यांच्याबद्दल ऐकले होते. अभिनव ची सगळ्यांसोबतची वागणूक, त्यांच्याकडून बाकीच्यांना मिळणार समर्थन, सिद्धार्थ आणि विशाल चे एक एक गमतीदार किस्से सगळंच जस आम्हाला माहीत पडल होत. आमच्या टीम मध्ये आधी सगळेच मुल होते पण त्याच टीम मध्ये आमच्या सारिका मॅडम सुद्धा होत्या. आम्ही त्यांना बघितल खूप वेळ होत पण त्यांच्याशी कधी बोललो नव्हतो. त्या आमच्या प्रोसेस मध्ये आता जरी नसल्या तरी त्या कुठे तरी आमच्या च टीम चा आणि प्रोसेस चा काही भाग होत्या.आमच्या सरांकडून आम्ही ऐकलं होतं की त्या खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. सगळ्यांनाच अगदी सहजतेने त्या सामावून घ्यायच्या. मानलं की ऑफिस ची टीम आहे सहकारी आहोत प्रोफेशनल राहायला पाहिजे. पण आमचं काहीस वेगळ होतं. गरज पडेल तिथे प्रोफेशनल आणि गरज पडेल तिथे एकमेकांचा भाग होतो, जिवलग होतो.

     आमची ही टीम सगळ्यात न्यारी होती, हीच आमची टीम AURIZON होती....




Comments

  1. खरंच खूप छान आणि टीम aurizon ला सगळेच miss करत असतील, परत सगळे लवकरच भेटू

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...