#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

मैत्रीच्या वाटेवर....

मैत्रीच्या वाटेवर .... 
                                    लहापणापासून मित्रांसोबत केलेला आयुष्याचा प्रवास हा किती सुरेख असतो ना? ना आपल्याला कोणी काही बोलतील याची चिंता आणि कोणी आपल्याशी कसं वागेल याची काळजी...खरंच किती सुंदर आणि सुरेख असता ते बालपण.. सगळ्यांचेच कोणी ना कोणी असे मित्र असतात की त्याची जागा कधी कोणालाच देता येत नाही.आणि ती मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात.

                                        ओळख नसतानाही उगाच कागदाचे छोटे छोटे गोळे मारून फेकायचे , वेण्या ओढायच्या असे चित्र विचित्र प्रकार हे मित्र च करत असतात. आपल्या फ्रेंड्स मध्ये एक वेगळेच नात तयार होतं.आपले मित्र हे आपल्या सुखं दुःखात सहभागी होणारे असतात.त्यांच्या मध्ये कुठलाही स्वार्थी पणा नसतो.एक मेकांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून, अगदी चेहरे बघून सुद्धा हे लगेच ओळखतात की आपल कुठे काही बिनसलं आहे का ? आपण आनंदी आहोत का ? कुठली गोष्ट आपल्याला सतावतेय का? असे हे मित्र आयुष्यभर सोबत असले तर
जग्याची मज्जा काही वेगळीच असते... पण हे जे आयुष्य आहे ना ते आपल्याला वाटत तितका सोप्पा नसतं. आयुष्याच्या या खडतर वाटेवर चालताना आपल्या अनेक निर्णय घ्यावे लागतात.काही निर्णय खूप सहजतेने,सोप्या रीतीने घेता येतात.तर काही निर्णय घ्यायला हे खूप अवघड जातात.अनेक वेगवेगळे विचार डोक्यात येतात.आणि अशा या निर्णयामुळे कधी कधी आपल्या जवळची माणसं ,मित्र हे खूप दुखावले जातात.तो निर्णय घेण्याचं उद्देश कोणाला दुखवण अस नसत. त्याच व्यक्तीचं भल व्हावं म्हणून घेतलेला असतो.

                                                         अशा काहीशा या निर्णयामुळे दुखावलेला माणूस वेगवेगळे विचार करू लागतो आपला काही चुकल का? आपण कुठे कमी पडलो का? असे वेगवेगळे प्रश्न हे माणसाच्या मनात घर करत असतात.त्याला पडलेल्या त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित त्याला लवकर मिळणार नाहीत.त्यामुळे तो अजून दुखावला जातो,अजुन विचार करतो, depression मध्ये जातो.खर तर चूक ही कोणाचीच नसते.चूक त्या परिस्थतीची असते जी आपल्याला एका वेगळ्या वळणावर आणून ठेवते. आज पर्यंत अनेकांनी असे निर्णय घेतले असतील.कोणी घेत असेल,तर कोणाला पुढे जाऊन घ्यावे लागतील.अशा या निर्णयामुळे आपले जिवाभावाचे मित्र,माणसं, वस्तू कदाचित आपल्यापासून दुरावतील,आपल्यासाठी त्रासदायक ठरतील.पण त्या व्यक्तीची जागा मात्र तिथेच राहील.भले ती आपल्याशी बोलली नाही,दुरावली गेली तरीही काळजी मात्र सतत तिचीच राहील ,विचार ही सतत त्याच व्यक्तीचा येईल.ती व्यक्ती मात्र सततच आपल्या मनात राहील.हे त्या दोन्ही व्यक्तीसाठी  सारख्याच राहतील.ज्याच्यामुळे दुखावलं जाईल आणि जो दुखावला जाईल.


पण त्या परिसथितीतही आपण खंबीर राहायला शिकलं पाहिजे.माणूस जरी परिस्थितीला बदलू शकला नाही तरी परिस्थिती निच्छितच माणसाला बदलून टाकते.पण अशा वेळी आत्महत्येचा विचार मनात मध्ये येणं,खान पिन सोडणे असा करायपेक्षा प्रत्येकाने जर असा वेळी आपल्या आयुष्यात जे होता ते आपल्याच चांगल्यासाठी होतं अस समजून जर प्रत्येक पाऊल टाकत राहील तर नक्कीच माणूस यशस्वी होऊ शकतो आणि पुढे जाऊ शकतो.
   मैत्रीच्या वाटेवर .... 


असाच एक मैत्रीचा प्रवास मर्मबंधा मध्ये कसा झाला तो वाचण्यासाठी नावावर क्लिक करा ... 
आणि मर्मबंधा म्हणजे काय जाणून तर घ्याचंय ना 



                                                                                                     Your Love & Respect
                                                                                                        Manasi Bharambe
                                                                                                         Banker || Blogger




Comments

  1. खूप छान लिहिलंय, वाचताना त्या दिवसात जगल्याचा फील येतो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन