#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

वातावरणातील फेरबदल....





नमस्कार मित्रमंडळींनो...
              दररोजच्या या धावपळीच्या दूनियेमधून सगळ्यांनाच थोडसं relaxation हवं असतं.मग ते कोणीही असो शाळेत, कॉलेज मध्ये शिकणारे मुल किंवा नोकरी करणारी मोठी माणसं.कॉलेज च्या मुलांसाठी असते ती म्हणजे सहल. सहली चा विषय निघाला की सगळ्यांना एका वेगळ्या प्रकारची उत्सुकता लागलेली असते.मस्त खायचं प्यायचा ,मज्जा करायची,इकडे तिकडे फुलपाखरां सारखं बागडायच,खेळ खेळायचे आणि अजुन काय काय. मुलांच्या मनात किती प्रश्न येतात.कुठे जायचं,कधी जायचं,किती दिवस जायचं,कुठे कुठे फिरायच,काय न्यायचं ? बापरे.. आमचे तर कसे एकदम मज्जेचे दिवस आल्यासारखं वाटत होतं .आधी सहल नंतर स्नेह संमेलन हे सगळं मागोमाग असल्याने आमच्या कॉलेज मध्ये पालकांची सभा भरवण्यात आली होती.सभेचा विषय तर आम्हाला माहितच होता.पण सहल कुठे जाणार,कधी जाणार हे माहीत नव्हतं.पालकांची सभा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगण्यात आलं की आमची सहल ७ दिवसांसाठी बँगलोर ला जाणार आहे.
            खरं तर ते ऐकून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता.पण जस एका नाण्याच्या दोन बाजू असतात तसे माझ्या मनात विचार येत होते.एक बाजू म्हणायची झाली तर  बँगलोर कसं असेल,तिथे कसं जायचं,तिथे काय काय असेल असे बरेचसे प्रश्न मनात भिरभिरत होते.आणि दुसरी बाजू मांडायची झाली तर आज पर्यंत आई बाबांनी १० वीच्या शाळेच्या सहलीला ३ दिवसांसाठी पाठवल नाही ते ७ दिवस आपल्याला कसे पाठवतील आणि ते ही एवढ्या लांब या विचारानेच मी भांभावून गेली होती.त्यामुळे घरी सुद्धा काही बोलली नाही.पण मला काय माहीत माझे आई बाबा या विषयी काही बोलत नाही म्हणजे ते मला अचानक सांगून आश्चर्यचकीत करणार आहेत.अगदी सहल जायच्या २ दिवस आधी सरांनी मला सांगितलं की तुला सुद्धा यायचं आहे.मला काही कळलंच नाही की अस का बोलतात ते.पण नंतर त्यांनी सांगितलं की तुझ्या आई बाबांनी तुला सांगायला नाही सांगितलं होत.तुला आश्चर्यचकीत करायचं होत त्यांना.ते ऐकून तर खूप आनंद झाला होता मला.तसे आनंद व्ह्याचे अजुन बरेच कारण होते.
          अखेर आमचा सहलीचा प्रवास सुरू झाला.खेड ते मिरज बस ने आणि मिरज ते बँगलोर रेल्वे ने.खरंच मिरज पर्यंत च्या प्रवासात तर खूप मज्जा केली. अंताक्षरी खेळली,डान्स केला,खूप विनोद केले.. आणि मिरज पासून पुढे जाता जाता स्टेशन ची नाव वाचता वाचता प्रवास कसा झाला तेच कळलं नाही. अगदी आम्ही बँगलोर ला पोहचलो.हॉटेल मध्ये थांबलो.दिवसभर खूप फिरलो वनस्पती उद्याना  मध्ये.वेगळ्या वेगळ्या झाडांची माहिती करून घेतली.खूप सुंदर वातावरण होत ते.जसं मी आधीच सांगितलं होतं की मी खूप आनंद झाला होता याच दुसरं कारण म्हणजे त्या दिवशी माझा वाढदिवस होता.बसमध्येच  सगळ्यांनी मला खूप शुभेच्छा दिल्या.अगदी परत येऊन आम्ही जेऊन झोपायला जातो तोपर्यंत कोणी काही बोललं नाही.अगदी थोड सुद्धा जाणवू दिलं नाही की सगळ्या शिक्षकांच्या मनात काय चाललय. झोपल्यावर परत सगळे एकत्र येऊन प्लॅन बनवून मग मला उठवून माझा वाढदिवस साजरा केला..खरंच ज्या गोष्टीची आपण कधी अपेक्षाच केली नाही ती गोष्ट अशी अचानक एका वेगळ्या पद्धतीने होण म्हणजे जरा नवलच आहे म्हणायचं.त्या ७ दिवसाच्या सहली मधले आमचे २ दिवस तर निघून गेले.नंतर पुढच्या ३ दिवसात आम्ही गार्डन मध्ये गेलो, त्रिवेणी संगम पहिला,गोल्डन टेम्पल,टिपू सुलतान पॅलेस पहिला.खर तर एवढ्या सगळ्या कॉलेज च्या मुलांमध्ये,त्या मज्जा मस्ती मध्ये हे ५ दिवस कसे निघून गेले तेच काही कळलं नाही.पण अजुन आमच्याकडे २ दिवस होते.त्या २ दिवसात कुठे जायचं,काय काय मज्जा करायची त्याच जणू काही आम्ही वेळापत्रक च बनवून ठेवलं होतं.
       सहाव्या दिवशी आम्ही सगळे मैसुर पॅलेस मध्ये गेलो.आम्ही मस्त शिस्तबद्ध पद्धतीने त्या पॅलेस मध्ये शिरलो.खरं तो पॅलेस खूप मोठा आहे.तेवढं मोठा पॅलेस सगळे मुल एकत्र च आम्ही फिरत होतो.पण म्हणतात ना कुठही गेलं तरी काही ना काही असे किस्से घडतात की ते नेहमी लक्षात राहतात.तसच काहीस पुन्हा झालं होतं.आम्ही ५-६ मुली त्या पॅलेस मध्ये हरवलो होतो.सगळ्यांना शोधत बसलो होतो.कुठे कोणी दिसतंय का आपल्या बरोबरच.जवळ जवळ १५ ते २० मिनिट आम्ही सगळ्याची वाट बघत होतो,इकडे तिकडे बघत होतो,थोडी भीती वाटतं होती कारण कोणी आमच्या ओळखीचं दिसतच नव्हत.पण आम्हाला आमच्या वागण्यावरच हसायला मात्र येत होत.येवढे सगळे जण सोबत असताना आपण हरवू कस शकतो तेच काही कळत नव्हतं.नंतर मात्र राहवलं नाही शिक्षकांना ना फोन करून बोलावून घेतलं आणि पुन्हा आम्ही आमच्या ग्रुप मध्ये जाऊन सहभागी झालो.तिथेच आम्ही आमचा एक ग्रुपफोटो सुद्धा काढला.तो फोटो जरी डोळ्यासमोर आला तरी सगळ्या आठवणी मात्र ताज्या टवटवीत होतात.
       आता आमच्याकडे आमचा बँगलोर मधला  शेवटचा म्हणजेच ७ वा दिवस राहिला होता.दिवसभर मस्त फिरून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघायचे होतं.अगदी रोजच्या आमच्या वेळापत्रका प्रमाणे सकाळी उठून हॉटेल मध्ये नाश्ता करून आम्ही सगळे निघालो wonderla या ठिकाणी.. खरंच त्या ठिकाणी गेलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही एका waterpark सारख्या ठिकाणी आलो आहोत.जिथे फक्त मज्जा मस्ती,खूप वेगवगळ्या प्रकारच्या राईड, वेगवेगळे गेम्स असतील.धम्माल असेल....
      अजून एक गोष्ट आम्हाला कळाली ती म्हणजे तिथे आम्हाला त्यांचे अनिवार्य असणारे ड्रेस मिळणार होते.आजू बाजूच्या लोकांना बघून च आमच्या सगळ्या मुलीच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या.त्याच कारण म्हणजे त्यांचे ते ड्रेस t-shirts Ani shorts असे होते.आजकाल सगळ्याच मुली शॉर्ट्स घालतात.त्यामुळे त्याच काही वाटलं नाही आम्ही सहजच तस फिरू शकतं होतो.पण आमचे शिक्षक आमच्या बरोबर होते.असे शिक्षक ज्यांना मुली jeans मध्ये सुद्धा चालत नाहीत आणि अशा शिक्षकांसमोर शॉर्ट्स वर जाण ह्या विचारानेच आमच्या चेहऱ्यावर जणू काही १२ वाजलेले स्पष्ट दिसत होते.पण नंतर मात्र सगळे सर म्हणाले शेवटचा दिवस आहे कपाळावर पाडलेल्या आठ्या बाजूला करा आणि मस्त मज्जा करा.तेव्हा कुठे आमच्या चेहऱ्यावर हसू आलं.दिवसभर खूप rides enjoy केल्या.मज्जा मस्ती केली, फोटो काढले. खरंच ते ठिकाण खूप सुंदर होतं.सारखं सारखं वेगवेगळे गेम्स खेळायचे.पाण्यात उद्या मारायच्या आणि अजुन धम्माल करायची आणि तिथेच राहायचं असं वाटतं होत.खरंच त्या ७ दिवसात एखाद ठिकाण एवढं आवडायला लागेल  अस वाटल नव्हतं. आम्ही सगळेच विसरून गेलो होतो की रोजच्या त्या hectic schedule मधून  थोडी सुटका मिळावी म्हणून हा आमच्यासाठी सगळ्या शिक्षकांनी मिळून केलेला वातावरणातील एक फेरबदल होता.ज्याने आमचा stress कमी केला. आणि ज्या आनंदाने आम्ही पहिलं पाऊल त्या अनोळखी शहरात ठेवलं होतं तितक्याच सहजतेने आम्हाला तिथून परतणं शक्य नव्हतं म्हणून च तिथल्या सगळ्या आठवणी मनामध्ये साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.
      वातावरणातील फेरबदल हे किती महत्त्वाचे असतात ते तर आपल्याला या लॉकडाऊन मुळे तर कळलेलच आहे.आपल्याला बाहेर जाता नाही तर बाहेर च निसर्ग किंवा आपल्या आवडीची ठिकाण तर आपल्याजवळ येऊ शकतात .आठवणी आपल्याला आनंदी ठेवू शकतात.......
   


 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन