#3397








नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल.

मैत्रीला कधी गंध नसतो,

मैत्रीचा फक्त छंद असतो,

मैत्री सर्वांनी करावी

त्यात खरा आनंद असतो.

हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच.

सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे मला पूर्ण ओळखतात त्यांचा विश्वास बसणं जरा अवघडच आहे. कारण मी स्वतःच खूप कमी बोलते त्यामुळे कोणाशीही मैत्री करायची असली तर माझ्याकडून खूप कमी वेळा पहिला पाऊल उचलल जात. पण तस बघायला गेलं तर त्यांच्याशी माझ्या vibes खूप जास्त जुळून आल्या. म्हणून च कदाचित मी एवढे बोलले असावे. जिथे जाईल तिथे सगळ्यांच्या तुलनेत लहान च पडायची मी. त्यामुळे सगळीकडे मला थोडी वेगळी वागणूक मिळायची. खूप प्रेमळ अशी, समजून घेतला जाणारी, वेळप्रसंगी बोलला जाणारी. इथेही तेच झालं काही तरी विषय निघाला आणि प्रत्येकाच वय विचारला जाऊ लागला इथेही मीच लहान होती. त्यामुळे इथे ही मला तेच प्रेम आणि जिव्हाळा मिळाला. खूप आगळ्या वेगळ्या माणसांच्या सहवासात होते मी. कोणी कोणी तर खूप मोठे होते पण ते आमच्या मस्ती मध्ये वीरून जायचे कोणी फक्त मला टोमणा मारणारे होते की अरे तू आज इथे बसली आज बसायला पहिल आसन भेटलं नाही वाटतं. कोणी एवढं बालिश होत की लहान मुलं कस सांगत येतात मम्मी मम्मी मला याने मारलं तस जाऊन रडून रडून दुसऱ्याला सांगायचं की मला याने चिडवला. असे लोक आता या वयात बघायला मिळणं म्हणजे जरा आश्चर्यांची च गोष्ट होती. कोणी तरी अशी एक व्यक्ती होती जिचं नाव ऐकून अगदी मन प्रसन्न होईल असं वाटत होत. पण खरंच जेव्हा त्या व्यक्तीला बघितला तेव्हा मात्र त्याच्या चेहऱ्यावर असणारे हावभाव बघून थोडं चुकल्यासारखंच झालं. आमचे च हाव भाव अगदी बदलून गेले होते. त्याच्याकडे बघून असं वाटायला लागला होता जसं त्याच्या नावाने अर्थाचा अनर्थ केला असावा. काही जण दिसायला छोटी होती तर वयाने मोठी आणि काही त्याच्या अगदी उलट. खरी गंम्मत तर तेव्हा आली जेव्हा मला समजल की जो मुलगा मी जिथून गाडीत बसते तिथून च बसायचा आणि मी जिथे उतरते तिथेच उतरायचा तोच मुलगा माझ्याच्या घराच्या समोरच्या इमारती मध्ये राहतो याचा उलगडा मला 3 महिन्यांनी झाला. हे समजल्यावर मात्र हसूच अनावर होत नव्हतं. सगळ्यांमध्येच एवढी  चांगली मैत्री झाली होती की आता आम्हालाच  आम्ही कोणती तरी वेगळे आहोत असं वाटायला लागलं. त्या बस (3397) मध्ये असणारी ती अपार शांतता आता कुठे तरी हरवून गेली होती आणि त्याची जागा आता आमच्या मध्ये झालेल्या घट्ट मैत्रीने घेतली होती.त्या बस मध्ये येता जाता घालवले ते 2 तास रोजच आयुष्यात नवीन काही शिकवून जात होते.आणि आता मात्र ते खूप हवे हवेसे वाटत होते. 

पण आपल्याला जे हव हे नेहमीच होत नाही ना. काही तरी होईल आणि आपण एकमेकांपासून दुरावले जाऊ हे भावना मनात येणार नाही तर ते आयुष्यच कसलं.इथेही तेच झालं. बघता बघता आमचा सगळ्यांचाच शिफ्ट टाईमिंग बदलला आणि सगळे वेगळे वेगळे झालो. आणि त्यात तर माझा शेवटचा दिवस त्या ऑफिस चा. सगळंच अगदी पूर्णपणे बदलून गेलं. पण आमची मैत्री मात्र अजूनही तशीच राहिली. आज पर्यंत शाळेतली मैत्री ऐकली, कॉलेज ची मैत्री सुद्धा ऐकली, ऑफिस ची सुद्धा ऐकली पण ही गाडी आगळी वेगळी ऑफिस च्या कॅब वाली मैत्री होती... #3397 


                            

                                    

Comments

Popular posts from this blog

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन