Posts

Showing posts from June, 2020

#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

अनोळखी पर्वातील पहिलं पाऊल...

Image
जून महिना जसा जसा जवळ येतो तस तस मुलांची उत्सुकता वाढत जाते. शाळेतून कॉलेज मध्ये जाणार याचा खूप आनंद झालेला असतो.नवीन कॉलेज,नवीन वर्ग,नवीन शिक्षक,नवीन मित्र मैत्रिणी सगळा काही नवीन असतं.त्यामुळे थोडी भीती ही असतेच मनामध्ये.१० वी पर्यंत चे सगळे शिक्षक कसे आपल्या ओळखीचे होते.त्यांची शिकवण्याची पद्धत आपल्याला अवगत होती.आपण त्यांच्यामध्ये त्या १० वर्षात अगदी रुळून गेलो होतो.मग अचानक या नवीन कॉलेज मध्ये यायचं तर भीती ही वाटणारच ना?कारण तिथुन आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात होते.            कॉलेज म्हटलं की सगळ्या मुलांच्या मनात एकच असत.खूप मज्जा करायची, लेक्चर चुकवून कुठे तरी बाहेर जायचं , कॉलेजच्या मैदानात मनसोक्त खेळायच. तिथले शिक्षक जास्त ओरडत नाहीत .शाळेत जस इथेच बसून अभ्यास कर म्हणतात तस करत नाही. विद्यार्थ्यांना ओरडत नाही असा समज हा सगळ्या मुलांचा होतो.पण आमचं ज्ञानदीप कॉलेज मात्र अगदी शाळेसारख होत. जसं शाळेत आपल्याला  गणवेश  असायचा तसा या कॉलेज ला सुद्धा गणवेश होता.आणि खर सांगायचं झालं तर कॉलेज का सुद्धा गणवेश आहे हे ऐकूनच मला खूप आनंद झाला होता.खरंच ना नाहीतर आम्हा मुलींचा अर्धा जास्त

मैत्रीच्या वाटेवर....

Image
मैत्रीच्या वाटेवर ....                                       लहापणापासून मित्रांसोबत केलेला आयुष्याचा प्रवास हा किती सुरेख असतो ना? ना आपल्याला कोणी काही बोलतील याची चिंता आणि कोणी आपल्याशी कसं वागेल याची काळजी...खरंच किती सुंदर आणि सुरेख असता ते बालपण.. सगळ्यांचेच कोणी ना कोणी असे मित्र असतात की त्याची जागा कधी कोणालाच देता येत नाही.आणि ती मिळवण्यासाठी खडतर प्रयत्न करावे लागतात.                                         ओळख नसतानाही उगाच कागदाचे छोटे छोटे गोळे मारून फेकायचे , वेण्या ओढायच्या असे चित्र विचित्र प्रकार हे मित्र च करत असतात. आपल्या फ्रेंड्स मध्ये एक वेगळेच नात तयार होतं.आपले मित्र हे आपल्या सुखं दुःखात सहभागी होणारे असतात.त्यांच्या मध्ये कुठलाही स्वार्थी पणा नसतो.एक मेकांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून, अगदी चेहरे बघून सुद्धा हे लगेच ओळखतात की आपल कुठे काही बिनसलं आहे का ? आपण आनंदी आहोत का ? कुठली गोष्ट आपल्याला सतावतेय का? असे हे मित्र आयुष्यभर सोबत असले तर जग्याची मज्जा काही वेगळीच असते...   पण हे जे आयुष्य आहे ना ते आपल्याला वाटत तितका सोप्पा नसतं. आयुष्याच्या या खडतर व

मर्मबंधा कडे वाटचाल....

मर्मबंधा कडे वाटचाल....                                 जून महिना सुरू झाला म्हणजे सगळे मुल ही आपल्या शाळेत , कॉलेज ला जायची तयारी करतात.नवीन कपडे,नवीन दप्तर,नवीन पुस्तक सगळ्या गोष्टी नवीन घेतात.नवीन वस्तू घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात.कॉलेज निवडायचं म्हटलं की जो तो आपल्या आवडेल ते जवळ पडेल ते आणि आपले मित्र मैत्रिणी असतील अस कॉलेज निवडतात.पण माझं मात्र तास नव्हत.कॉलेज सुरू होईल त्याच्या २-३ दिवस आधी मी आई बाबांसोबत बाहेर गेले तेव्हा मला कळलं की कुठल्या कॉलेज मध्ये मी शिकणार आहे आणि कुठल्या हॉस्टेल मध्ये राहणार आहे. आई बाबांनी माझ्या कॉलेज ची निवड केली याच मला काहीच नवल नव्हतं.                                                   मी अगदी आनंदाने त्या कॉलेज ला जायला तयार होते.पण हॉस्टेल ला राहायचं ही कल्पना मला करवत नव्हती.माझ्या सारखी कमी बोलणारी,मनाने खूप हळवी असणारी मुलगी हॉस्टेल मध्ये सगळ्यांशी जुळवून घेईल का? त्या सगळ्या मुलींशी बोलेन का? आज पर्यंत आई बाबा सांगत आले की हे बरोबर आहे असं करायचं ,हे चूक आहे असं नाही करायचं,पण आता अशा गोष्टी आपल्याला समजावून सांगणार कोणी असेल का? मला समज

निसर्गाच्या सानिध्यात मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास...

Image
नमस्कार मित्र मंडळीनो.... मला खात्री आहे तुम्हाला मित्र मंडळी ऐकून खूप आनंद झाला असेल. कारण आता इतक्या सहजतेने आपल्याला कोणी मित्र बनवत नाही आणि आपण सुद्धा कोणाला मित्र बनवून घेत नाही.कारण कोणाचं स्वभाव कसा आहे कोण आपला कधी वापर करून घेईल हे सांगता येणं जरा अवघड च आहे. शाळेत असलेली मैत्री ही निस्वार्थी मैत्री असते अस म्हणतात. आणि हे खरंच आहे.लहानपणापासून चे आपले मित्र मैत्रिणी हे आपल्याला जीव लावणारे असतात.स्वतःचा विचार करणार नाही तितका आपल्या मित्राचा विचार करतात. जितकी काळजी ते आपली घेत नाही तितकी जिवाभावाच्या मित्रांची घेतात.कधी काही चुकलं तर सरळ कान ओढून सांगतात.जिथे बरोबर असतो तिथे आपली बाजू घेतात.आपल्या बाजूने बोलतात.आपल्याला काही वेगळं करावस वाटलं तर त्याला ते प्रोत्साहन पण देतात.असे हे जिवाभावाचे मित्र मैत्रिणी सगळ्यांच्याच आयुष्यात येतात.त्यांच्या सोबत घालवलेले क्षण हे अविस्मरणीय असतात. शाळेत केलेली मज्जा मस्ती , छोटी छोटी शी भांडण नेहमी लक्षात राहतात. आणि ती आठवली की चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू च येत. त्यांच्या सोबत घालवलेले आनंदाचे काही क्षण नेहमी लक्षात राहतात.पण हे त्यांच्या

बोन्साय झाडाचे मनोगत.......

Image
बोन्साय झाडाचे मनोगत.......         ५ जून हा दिवस आपण सगळेच पर्यावरण दिन म्हणून अगदी आनंदाने साजरे करत आलो आहोत. पण आताच्या या जगात कुठलाही दिवस असतो फक्त insta vrti story aani what's app vr status baghayala मिळतात, पण त्याच दिवशी एक सुंदर असा छोटंसं रोपट लावायला विसरतात. आपल्याला सगळ्यांनाच garden मधे फिरायला खूप आवडतं. लहान मुलांना गार्डन मध्ये खेळायला आवडतं पण आपण आपल्यालाच अजुन एका झाडाची सावली मिळावी म्हणून छोटंसं रोपट लावायला विसरतो. पर्यावरण दिनानिमित्त आमच्या छोट्याश्या गावात एक छोटंसं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आताच्या या काळात सगळी कडे मोठ्या मोठ्या इमारती बघायला मिळतात त्यामुळे लहान मुलच काय तर अगदी मोठी मोठी माणसं सुद्धा झाडाची नाव विसरून जातात. त्या प्रदर्शनामुळे का होईनात पण आपल्याला नवीन झाडांची माहिती होईल या उद्देशाने आम्ही सगळी मित्रमंडळी तिथे गेलो. त्या प्रदर्शनात वेगवेगळी रोपटी , झाड, वेली आम्हाला   बघायला मिळाल्या.  आम्ही जस प्रदर्शन बघायला गेलो होतो अगदी तसेच तिथे २ आजोबा आले होते.ते आम्हाला प्रत्येक झाडाचं नाव सांगत होते.त्याचे आपल्याला होणारे वेगवेगळे उपयोग