मर्मबंधा कडे वाटचाल....
जून महिना सुरू झाला म्हणजे सगळे मुल ही आपल्या शाळेत , कॉलेज ला जायची तयारी करतात.नवीन कपडे,नवीन दप्तर,नवीन पुस्तक सगळ्या गोष्टी नवीन घेतात.नवीन वस्तू घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात.कॉलेज निवडायचं म्हटलं की जो तो आपल्या आवडेल ते जवळ पडेल ते आणि आपले मित्र मैत्रिणी असतील अस कॉलेज निवडतात.पण माझं मात्र तास नव्हत.कॉलेज सुरू होईल त्याच्या २-३ दिवस आधी मी आई बाबांसोबत बाहेर गेले तेव्हा मला कळलं की कुठल्या कॉलेज मध्ये मी शिकणार आहे आणि कुठल्या हॉस्टेल मध्ये राहणार आहे. आई बाबांनी माझ्या कॉलेज ची निवड केली याच मला काहीच नवल नव्हतं.
मी अगदी आनंदाने त्या कॉलेज ला जायला तयार होते.पण हॉस्टेल ला राहायचं ही कल्पना मला करवत नव्हती.माझ्या सारखी कमी बोलणारी,मनाने खूप हळवी असणारी मुलगी हॉस्टेल मध्ये सगळ्यांशी जुळवून घेईल का? त्या सगळ्या मुलींशी बोलेन का? आज पर्यंत आई बाबा सांगत आले की हे बरोबर आहे असं करायचं ,हे चूक आहे असं नाही करायचं,पण आता अशा गोष्टी आपल्याला समजावून सांगणार कोणी असेल का? मला समजून घेणार कोणी असेल का?असे बरेच प्रश्न माझ्या मनात घर करत होते. आपण सगळेच ऐकत असतो की हॉस्टेल च वातावरण खूप कडकं असत.
खूप नियम असतात.आणि अस सुद्धा ऐकतो की हॉस्टेल लाईफ ही खूप चांगली असते.तिथे मज्जा मस्ती करायला मिळते.बाहेर फिरायला मिळत.आई बाबांचं बोलणं ,टोकण नसत.पण या सगळ्या गोष्टी बोलायला आणि सांगायला च सोप्प्या आणि साध्या असतात.पण तस अजिबात नसतं.शेवटी तो दिवस उजाडला.मी हॉस्टेल ला गेले.सगळ्यांशी ओळख व्हावी म्हणून एक दिवस आधी गेले.सगळ्यांशी ओळख झाली.जस कोणी सांगत की हॉस्टेल मध्ये खूप कडक नियम असतात.तसेच नियम माझ्या ही हॉस्टेल ला होते. आपला वस्तू आपल्या जागेवर ठेवणं,तिथल्या वस्तू नीट वापरणं, इतकचं काय तर आम्हाला मोबाईल सुद्धा रात्री जेवण झालं की ९ ते ९:३० इतका वेळ मिळायचा.कुठे बाहेर जायचं झालं किंवा घरी जायचं झालं तर आई बाबांचा काही मेसेज आला तरच पाठवण्यात यायचं.हे असे काही नियम होते जे अगदी कडक पाळले जायचे.खूप जण ही हॉस्टेल ला राहतात.पण खूप कमी जणांचे अनुभव हे चांगले असतात.
त्या हॉस्टेल मध्ये जस नियमांच बंधन होतं तितकाच जिव्हाळा आणि प्रेम तिथे मिळालं.जसे आई बाबा आपल्या मुलांची काळजी घेतात अगदी तितक्याच सहजतेने ते आमची काळजी घेणारे होते,चुकल्यावर समजावून सांगणारे, वेळप्रसंगी ओरडणारे,लाड पुरवणारे,आई बाबा मुलांना जस बाहेर गेल्यावर खाऊ घेऊन येतात तसा खाऊ घेऊन येणारे,कधी हॉस्टेल मध्ये , कॉलेज मध्ये बोर झालं तर बाहेर फिरायला नेणारे,वेगवेगळ्या गोष्टी सांगणारे,सगळे सण साजरे करताना आम्हाला त्यात सामावून घेणारे,नवीन नवीन गोष्टी शिकवणारे,चांगल्या सवयी लावणारे हे सगळ्यांच्या भाषेत असणारे हे रेक्टर च पण आमच्यासाठी ते आमचे दुसरे आई बाबा होते जे त्यांच्या मुलीसारखं वागवयचे, लळा लावायचे..आम्ही त्यांना काका काकू म्हणायचो.
ते हॉस्टेल नसून आमचं दुसरं घर होतं जिथे आम्ही सहज वावरायचो,पकडा पकडी खेळायचो , लपाछपी खेळत खेळत अख्खं घर डोक्यावर घेत होतो.जस त्या घराचं नाव मर्मबंध होत तशीच त्या घरातली माणसं सुद्धा मनमिळाऊ होती, सगळ्यांना आपला मानून चालणारी होती.जसे मणी एकच दोऱ्यात ओवले तर त्याच मण्याची माळ तयार होते अगदी तसच त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये जोडून एक छोटंसं कुटुंब तयार केलं होतं...
हॉस्टेल मध्ये राहणारी मुल मज्जा करतात हे खरंय पण त्या सगळ्यांनाच हॉस्टेल मध्ये आपल्या घरच्यासारखी वागणूक,प्रेम मिळत नाही आणि हेच वेगळपण आम्हाला तिथे मिळालं....अजुनही मी हॉस्टेल लाच राहते पण तरी सुद्धा त्या घरात मिळालेल्या वागणुकीमध्ये, प्रेमामध्ये आणि आता राहतो तिथल्या वातावरणात खूप प्रकर्षाने तफावत जाणवते..
Your Love & Respect
Manasi Bharambe
अतिशय सुरेख लिखाण
ReplyDeleteThank u 🙂
DeleteNice writing.....
ReplyDeleteखूप छान!!!
ReplyDeletethanku all of you
ReplyDelete