#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

बोन्साय झाडाचे मनोगत.......

बोन्साय झाडाचे मनोगत.......

   
  ५ जून हा दिवस आपण सगळेच पर्यावरण दिन म्हणून अगदी आनंदाने साजरे करत आलो आहोत. पण आताच्या या जगात कुठलाही दिवस असतो फक्त insta vrti story aani what's app vr status baghayala मिळतात, पण त्याच दिवशी एक सुंदर असा छोटंसं रोपट लावायला विसरतात. आपल्याला सगळ्यांनाच garden मधे फिरायला खूप आवडतं. लहान मुलांना गार्डन मध्ये खेळायला आवडतं पण आपण आपल्यालाच अजुन एका झाडाची सावली मिळावी म्हणून छोटंसं रोपट लावायला विसरतो. पर्यावरण दिनानिमित्त आमच्या छोट्याश्या गावात एक छोटंसं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. आताच्या या काळात सगळी कडे मोठ्या मोठ्या इमारती बघायला मिळतात त्यामुळे लहान मुलच काय तर अगदी मोठी मोठी माणसं सुद्धा झाडाची नाव विसरून जातात. त्या प्रदर्शनामुळे का होईनात पण आपल्याला नवीन झाडांची माहिती होईल या उद्देशाने आम्ही सगळी मित्रमंडळी तिथे गेलो. त्या प्रदर्शनात वेगवेगळी रोपटी , झाड, वेली आम्हाला   बघायला मिळाल्या.  आम्ही जस प्रदर्शन बघायला गेलो होतो अगदी तसेच तिथे २ आजोबा आले होते.ते आम्हाला प्रत्येक झाडाचं नाव सांगत होते.त्याचे आपल्याला होणारे वेगवेगळे उपयोग सांगत होते.आम्हाला तर अस वाटत होतं की जणू ते आमची आणि त्यांची ओळखच करून देत आहेत. आम्ही सगळी मित्र मंडळी ती वेगवेगळी झाड,वेली बघण्यात अगदी गुंतून गेलो होतो. तिकडे काही झाड खूप सुंदर होती.त्यांना वेगवेगळा आकार दिला होता. एक झाड हत्तीच्या आकारात कापलं होत तर एक घोड्या च्यां आकारात. ती झाड दिसायला इतकी सुंदर आणि आकर्षित दिसत होती की बस्स. सारखं सारखं त्यांना बघावस वाटत होतं.त्याच्या वरून हात फिरवत होतो. तसाच एका कोपऱ्यात झाडाला मडक्याच्या आकार दिला होता मी तर तिकडेच धाव घेतली .खूप सुंदर होता ते झाड .मागे फिरते तोच जोरात वारा आला आणि खळबळ सुरू झाली. पावसाळ्याचे दिवस सुरु होते जोरात पाऊस येईल म्हणून सगळेच बाहेरच्या दिशेने गेले.     
मी पण जातच होती तितक्यात कानावर एक आवाज पडला."ताई तू तरी थांब ग".असा आवाज येताच मी इकडे तिकडे बघितलं पण मला कोणीच दिसलं नाही. मला कदाचित भास झाला असेल असं समजून मी परत पुढे जायला निघाली. पुन्हा तोच आवाज माझ्या कानावर पडला. मग मात्र मी घाबरले,थोड्यावेळ इकडे तिकडे पाहतच राहिले,आवाज कुठून येतोय कोण देताय,असे बरेच से प्रश्न माझ्या मनात घर करून राहत होते.काही सुचत च नव्हता ,मिनिटभर तर थबकून च गेले होते. मी मन धीट करून निघेल तोवर परत तसाच आवाज आला. आणि मी ते मडक्यासारख दिसणार झाड बोलतोय असा आवाज आला. मी गांगरून च गेले. एखाद्या माणसाशी झाड बोलतोय ही कल्पनाच मला करवत नव्हती.घाबरून घाबरून मागे वळले. त्या मडक्यासारख्या दिसणाऱ्या झाडाकडे पाहिले.तोच ते झाड परत बोलू लागले.आता तर हसत होतीस इतका निरखून मला बघत होतीस आणि आता लगेच एवढी गप्प? त्या झाडाच्या या प्रश्नाचं उत्तर काय द्यायचं तेच मला कळेना.आधीच ते झाड माझ्याशी एका माणसाशी बोलतय हीच कल्पना करवत नव्हती.मी अजुनही घाबरलेले च होते.तेव्हा ते झाड मला म्हणाले अग ताई घाबरु नको ग,मी तुला काही इजा करणार नाहीये. जसं तुम्हा माणसांना तुमचं मन मोकळं करायचं असतं तसाच आज मला सुद्धा मझ मन मोकळं करायचं आहे.त्या झाडाचं बोलणं ऐकून मी स्थिर झाले. ते झाड विचारायला लागलं की कसे वाटत आहेत आम्ही सगळे वेगवेगळ्या आकारामध्ये ? मगाशी तुमच्या चेहऱ्यावर वरच्या हसू ने सगळं समजला होत.पण कधी विचार केला आहे का तुम्ही माणसांनी आम्हाला कसं वाटत असेल?काय वाटतं असेल? कधीच नाही...तुम्हा मुलांना कोणी चिडवला की तू बुटका आहेस तर तुम्ही रडून रडून अख्खा घर डोक्यावर घेता,तुम्हाला वाईट वाटतं म्हणून तुमच्या घरचे तुमची समजूत काढतात तुम्हाला हसवतात मग हेच सगळा आमच्या बरोबर का नाही.आम्हाला प्रत्येकाला आमची एक विशिष्ट आकार आहे उंची आहे तुम्ही त्याला तुमच्या घरची बागेची शोभा वाढवायला सहज खुंटून टाकता आम्हाला बोन्साय करून टाकता.तुम्हाला लागला तर तुम्ही ओरडता त्याला इलाज करता.मग तुम्ही अस वागुन आम्हाला का इजा करत? आम्ही तुमच्या सारखे माणसं नसलो तरी सजीव च आहोत ना.तुमच्या सारख्या भावना, मन आमच्याकडे ही आहे .पण तरी आम्म्ही तुमच्याशी निस्वार्थ पणाने वागत असतो.तुम्हाला औषधी, सावली,फळ ,फुल सगळं देतो.एवढेच नाही तर तुम्हाला जगता यावं म्हणून आम्ही तुम्हाला ऑक्सिजन देतो,आणि तरी तुम्ही आमची उंची सारखी सारखी खुंटवून आम्हाला जिवंतपणी मारून टाकता.का अस करता ?का?त्या झाडाचं हे बोलणं ऐकून मला गहिवरून आला.आपण सगळेच आपल्याच स्वार्थासाठी किती मोठी चूक करतो हे कळून आलं. आज पर्यंत खूप वेगवेळया गार्डन मध्ये गेले होते.असेच खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराची झाड बघितली होती.पण आज कळून चुकलेकी खरंच च ही सगळी झाडं आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपली मदत च करत असतात.मग आपण च यांना का दुखावतो,आपण तर यांचं रक्षण करायला हवं त्याच सवर्धन करायला हवं....



                                                                                    Your Love & Respect
                                                                                     Manasi Bharambe
                                                                                     Blogger | Banker

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन