#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

निसर्गाच्या सानिध्यात मैत्रीचा एक अविस्मरणीय प्रवास...

नमस्कार मित्र मंडळीनो....

मला खात्री आहे तुम्हाला मित्र मंडळी ऐकून खूप आनंद झाला असेल. कारण आता इतक्या सहजतेने आपल्याला कोणी मित्र बनवत नाही आणि आपण सुद्धा कोणाला मित्र बनवून घेत नाही.कारण कोणाचं स्वभाव कसा आहे कोण आपला कधी वापर करून घेईल हे सांगता येणं जरा अवघड च आहे.
शाळेत असलेली मैत्री ही निस्वार्थी मैत्री असते अस म्हणतात. आणि हे खरंच आहे.लहानपणापासून चे आपले मित्र मैत्रिणी हे आपल्याला जीव लावणारे असतात.स्वतःचा विचार करणार नाही तितका आपल्या मित्राचा विचार करतात. जितकी काळजी ते आपली घेत नाही तितकी जिवाभावाच्या मित्रांची घेतात.कधी काही चुकलं तर सरळ कान ओढून सांगतात.जिथे बरोबर असतो तिथे आपली बाजू घेतात.आपल्या बाजूने बोलतात.आपल्याला काही वेगळं करावस वाटलं तर त्याला ते प्रोत्साहन पण देतात.असे हे जिवाभावाचे मित्र मैत्रिणी सगळ्यांच्याच आयुष्यात येतात.त्यांच्या सोबत घालवलेले क्षण हे अविस्मरणीय असतात. शाळेत केलेली मज्जा मस्ती , छोटी छोटी शी भांडण नेहमी लक्षात राहतात. आणि ती आठवली की चेहऱ्यावर एक प्रकारचं हसू च येत. त्यांच्या सोबत घालवलेले आनंदाचे काही क्षण नेहमी लक्षात राहतात.पण हे त्यांच्या सोबत चे आनंदाचे क्षण घालवायला ,कुठे सोबत फिरायलच आम्हाला मिळायचा नाही. शाळेतल्या मित्र मैत्रिणी सोबत जायचं म्हणजे शाळेची सहल असेल तरच जाता येत.पण आमचं तस नव्हत.आमच्या शाळेची सहल ही फक्त १० वीच्याच मुलांची जायची.मग आम्ही कशी मौजमज्जा करणार म्हणून आमचे बस चे काका आणि त्यांची मुलं आमची दर वर्षी सहल घेऊन जायचे.ते जरी आमच्या पेक्षा मोठे असले तरी ते त्या दिवशी  मात्र आमच्या सारखेच आमचे छोटे मित्र बनून जायचे.कधी विनोद करायचे तर कधी गाणे म्हणायचे तर कधी डान्स....
अशीच आमची एकदा सहल गेली होती मुरुड जंजिरा या ठिकाणी गेली होती.सगळ्या मित्रमैत्रिणी सोबत जायला मिळेल मज्जा करायला मिळेल,मस्ती करायला मिळेल म्हणून सगळेच खूप उत्सुक आणि आनंदी होते. त्यात समुद्रातून गडावर जायचं याचा काही वेगळाच आनंद होता.सकाळी सकाळी आम्ही सर्व जण गडावर जायला निघालो.मस्त मस्त गाणी ऐकत , धिंगाणा करत चाललो होतो.मध्ये मध्ये थांबून निसर्गाचा आनंद घेत होतो. तिथल वातावरण खूप मस्त होत.आम्ही सगळे जण त्या वातावरणात अगदी हरवून गेलो होतो.ते निसर्गरम्य वातावरण पाहतच रहावस वाटत होतं.मुरुड जंजिरा हा किल्ला पाण्यामध्ये आहे.त्या किल्ल्यापर्यंत जायला बोटी होत्या.त्या बोटी मध्ये बसून जाण्याची मज्जाच काही वेगळी होती.पण अस असतानाही आम्ही घाबरत घाबरत त्या बोटी मध्ये बसलो.
एकमेकांचे हात पकडुन बसलो पण तरी आमची भीती जावी म्हणून सगळेच मुल आणि काका विनोद करून आम्हाला हसवत होते.हळू हळू आम्ही त्या गडावर पोहचलो.हळू हळू उतरलो आणि सगळे एकत्रित आलो आणि एक गाईड घेऊन गडावर गेलो.तो गाईड आम्हाला सगळी माहीत सांगत होता.आम्ही गडाच्या टोकावर जाऊन पोहचलो आणि तिथली तोफ बघितली.आजू बाजूचा परिसर इतका छान दिसत होता की त्याची कल्पनाच करवली जाणार नाही.मध्ये गड आणि गडाच्या आजू बाजूला चौफेर समुद्र च समुद्र.....खूप नयनरम्य आणि मनाला मोहून टाकणारे ते दृश्य होते..आम्ही सर्वांनी त्या निसर्गाचा आनंद घेतला.मज्जा केली ...खर तर तिथून जायचीच इच्छा होत नव्हती..पण आम्ही तिथल्या आठवणी टिपून ठेवल्या आणि परतीच्या प्रवासाला निघालो. येता येता पण तशीच धम्माल आणि मज्जा करत आलो.truth and dare Ani malavan पाण्यामध्ये किल्ला , अंताक्षरी असे खेळ खेळत खेळत  धम्माल करत करत घरी आलो..पण आमचं मन आमचं मन मात्र अजूनही त्या किल्ल्यावर च अडकलेलं होत..
                                                                          
                                                                                Your Love & Respect
                                                                               Manasi Bharambe
                                                                                Blogger || Banker

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

#3397

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

टीम ऑरिझोन