Posts

Showing posts from August, 2022

#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

टीम ऑरिझोन

Image
  आयुष्याच्या वाटेवर अनेक पायऱ्या येतात वेळोवेळी            त्या पायऱ्यांवर पाय ठेवून मिळवू यश पदोपदी..... अशीच एक महत्वाची पायरी म्हणिजे नोकरी. आताच्या जगात बऱ्यापैकी सगळेच नोकरी करतात. कोणी आवड म्हणून, कोणी परिस्थिती ची जाणीव म्हणून.         माझी ही पहिली नोकरी असल्यामुळे उत्साह खूप होता. नवीन काही तरी शिकू, आपण पण ऑफिस मध्ये जाऊन काम करू याचा आंनद होता. कधी काळी लहानपणी अभ्यास नको असलेले आपण नोकरी करायची इच्छा व्यक्त करायचो आणि आता तेच सत्यात उतरताना दिसत होते. सुरवातीला एक महिना काम घरून च करायचं होतं नंतर मात्र ऑफिस मधून काम करायचं होतं. आता कुठे घरून काम करायचं वेळापत्रक जुळत आल होत आता परत त्यात बदल करावा लागणार होणार होता. अर्थातच त्या नवीन वेळापत्रकाशी जुळवून घ्यायला वेळ सुद्धा लागणार होता.         पण ते म्हणतात ना जे होतं ते चांगल्या साठीच होतं. ऑफिस मधून काम चालू झाल्यापासून सगळ्यांना भेटता आलं त्या सगळ्यांशी जवळीक वाढत गेली. मला प्रशिक्षण देणारे अक्षय सर मला आधी थोडे रागीट आणि उद्धट वाटायचे पण जेव्हा त्यांना समोरून बघितल तेव्हा समजल की ते उद्धट नव्हते. ते स्वभावाने खूप चांग

पावसाची चाहूल आणि संगिनींची सोबत...

      पावसाळ्याची चाहूल लागताच मन कस सैरावैरा धाऊ लागतं. तो मातीचा दरवळणारा सुगंध, थंडगार वाहणारा वारा कसा हवाहवासा वाटतो आणि अशा या मनमोहक वातावरणात मनसोक्त फिरण्याची गम्मतच काही न्यारी असते म्हणून च नवीन नवीन ठिकाणी जाण्याचे विचार मनात भिरभिरत असतात. तसाच काहीसा विचार आमच्या ही मनात आला आणि शेवटी आम्ही त्या विचारावर अंमलबजावणी करायचं ठरवलं. आता सगळ्यात मोठा आणि नेहमीच ठरलेला प्रश्न आमच्या समोर होता. जायचं कुठे??         कोणत्या तरी अगदी महत्वाच्या विषयावर चर्चा करायची असल्यासारखी जणू आमची बैठक च बसली होती. काय तर मग सगळ्यांच्या सहमतीने आमचं एक ठिकाण ठरलं. पण सगळं ठरून झाल्यावर ती योजना रद्द होणार नाही असं होणं तर शक्यच नाही. तसंच काहीसं आमच्या सोबत पण झालं सगळं ठरल्यावर मात्र आमची ती योजना पार पडली नाही. सगळे अगदी निराश होऊन बसले होते. काही तरी छोटासा मुद्दा आडवा यावा आणि त्या बघितलेल्या स्वप्नांचा चुरा व्हावा अस झालं होतं ते. पण बाहेर फिरण्याची आमची सगळ्यांचीच अगदी तीव्र इच्छा असल्यामुळे काहीही करून आम्ही ती योजना सफल करायचं ठरवून ठेवलं होतं. काय तर मग आधीच सगळ्या गोष्टी ठरवून ठेवल्