Posts

Showing posts from March, 2022

#3397

Image
नाव वाचून च सगळ्यांची उत्सुकता वाढली असेल. असं नाव तरी का ठेवलं हा प्रश्न ही असेलच. जे तेव्हा तिथे माझ्या सोबत होते त्यांना तर समजलं असेलच पण काहींना ते उलगडायला थोडा वेळ नक्कीच लागेल. मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो, मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो. हे असं बोलला जात आणि ते खरही आहे. आम्ही सुद्धा असाच काहीसा प्रयत्न करत होतो आणि त्यात सफलही झालोच. सुरवातीला अगदी नितांत शांतता होती. कोणी कोणाशी बोलत नव्हतो सगळेच आपण आपला मोबाईल आणि आपली खाजगी आयुष्य यात गढून गेलो होतो. याचा अर्थ असा कधीच नव्हता की आमची एकमेकांशी बोलण्याची इच्छा नव्हती. बोलावसं सगळ्यांनाच वाटत होत पण फक्त गरज होती ती एखाद्या बोलक्या माणसाची जीने काहीही बडबड केली तरी बाकीचे बोलायला लागतील. आणि ती व्यक्ती आमच्यामध्ये सुद्धा आलीच. Hybrid मोड असल्यामुळे ती कधी तरीच आमच्या सोबत ऑफिस ला यायची. पण तरी तिच्या त्या बोलक्या स्वभावाने तिने सगळ्यांना बोलत केल. हळू हळू का होईना पण सगळे बोलायला लागले. आणि बोलण हे सुद्धा महत्वाचंच असत नाही का? आपण जर बोललोच नाही तर मैत्री तरी कशी होईल ना? हे मी बोलतेय यावर जे जे

निरोप

        तुम्हाला सगळ्यांनाच जरा नवलच वाटलं असेल. अजून कशाला काही सुरवात नाही आणि पहिलाच शब्द निरोप!!         अर्थातच निरोप घ्यायचा म्हटलं तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात हेच येत की आपण आता कधी भेटणार नाही एकमेकांपासून दूर होऊ. पण आपल्याला जे निरोप देणार असतात त्यांचा हेतू आपल्याला दुखवायचा नसतो तर ते त्या निरोपाचा माध्यमातून आपल्याला आपल्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करत असतात हे आपण विसरून च जातो.        आपल्या सगळ्यांनाच आपली १० वी झाली की शाळेकडून निरोप मिळतो, थोडक्यात sandoff. १२ वी झाल्यावर कॉलेज मधून ही मिळतो. पण आज पर्यंत कधी हॉस्टेल मधून पण sandoff होतो हे माहीत नव्हतं. आणि आज तोच दिवस उजाडला. आमचा त्या हॉस्टेल मधला शेवटचा दिवस. खर तर हॉस्टेल मधून आपण निघतोय म्हणून सगळ्यांनाच आनंद होतो. इथून पुढे ते कडक नियम पाळावे लागणार नसतात. आपल्याला आपलं आयुष्य हवं तसं जगण्याची मुभा मिळणार असते. पण आमचं मात्र तस नव्हतं. ते आमचं हॉस्टेल कमी आणि दुसरं घर जास्त होत जिथे आमचे आई बाबा नसून काका काकू होते. हे काका काकू म्हणजे सगळ्यांच्या शब्दातले रेक्टर च पण आम्ही त्यांना काका क